Family & Parenthood
आईची कबुली
आई म्हणाली, 'बाळा, मला तुझ्याकडून काही नको. तू फक्त सुखी राहा.' पण मला माहित आहे की तिला खूप काही हवे आहे. तिला हवे आहे की मी तिला वेळ द्यावा. तिला हवे आहे की मी तिच्याशी बोलत बसावे. तिला हवे आहे की मी तिला मिठी मारावी. पण ती मागत नाही कारण तिला माझ्यावर ओझे व्हायचे नाही. आई कधीच मागत नाही. ती फक्त देत राहते. आणि आपण तिला घेत राहतो. हे थांबले पाहिजे. आई, आजपासून मी तुला रोज वेळ देईन. तुझ्याशी बोलेल. तुझ्या डोक्यावर हात फिरवीन. तू माझ्यासाठी जे काही केलेस, त्यासाठी थँक यू.
💬 Responses (0)
No responses yet. Be the first to share your thoughts.